सोलापूर : हत्तूर येथील गुलमोहर ऑर्केस्ट्रा बारवर छापा; 49 जणांना अटक | पुढारी

सोलापूर : हत्तूर येथील गुलमोहर ऑर्केस्ट्रा बारवर छापा; 49 जणांना अटक

सोलापूर पुढारी वृत्तसेवा : विजयपूर रोडवरील हत्तूर येथील गुलमोहर ऑर्केस्ट्रा अँड बारवर पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकून 49 जणांना अटक केली. ही कारवाई शनिवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास करण्यात आली. यावेळी तोकड्या कपड्यावर अश्लील नृत्य करणार्‍या 13 नृत्यांगनाही मिळून आल्या.

या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह 7 दुचाकी, 8 चारचाकी वाहने, साऊंड सिस्टिम व इतर साहित्य असा 59 लाख 78 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कर्नाटकातील ग्राहकांचा मोठा समावेश आहे.

याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात बार मालक, चालक, कामगार यांच्यासह 47 ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारमालक तानाजी देवराव लकडे, बारचालक आकाश चंद्रकांत जाधव, वेटर शिवानंद बसू मसळीकर, देवीदास दगडू गायकवाड, गणेश दगडू गायकवाड, अभिषेक मनोज दणाणे, ग्राहक मल्लिकार्जुन दुडप्पा मरुळ, इरण्णा जटप्पा पुजारी, बरकतअली मकसूद कुरेशी, अमर महादेव कोंजारी, अमितकुमार नानासाहेब मोटे, सिकंदर माणिक धोत्रे, मिराज जलील कुरेशी, गौस अब्दुल गफूर टक्कलकी, आकाश सत्यवान हजारे, रवी प्रकाश निकम, प्रसाद मल्लिकार्जुन आळंद, ताज महिबूबसाब उमराणी, रियाज अहमद इमामसाब पठाण, सैफअली शरीफ बागवान, इब्राहिम नबी पटेल, मोहमद इरफान मेहताबसाब पटेल, नदीम बद्रुद्दीन पेंडारी, अरीफ बशीर कलेगार, शिरीष राम गायकवाड, आकाश संजय पठारे, रोहन रविंद्र गंगणे, महंमद तौसिफ मंहमद जाफर तेनाली, निसार अहमद इसाक सातबच्चे, संतोष बाळ रेड्डी, गौस रसुल पटेल, महेश राजकुमार ठाकूर, जब्बार खाजाभाई बागवान, अख्तार हुसेन गुलाम गौस दर्जी, अरबाज सैपन शेख, माणिक तिप्पा रेड्डी, अमितकुमार राजेंद्र समदळ, महंमद जाहीद महंमद अलीम दंडू, अनिकेत नागनाथ गोरट्याल, इब्राहिम सलीम शेख, सैपन शब्बीर इरकल, सलिम जब्बार तिलगर, गणपती बसवराज पुजारी, पांडुरंग अर्जुन शामल, सागर कट्याप्पा गायकवाड, विनोद व्यंकट सूर्यवंशी, रितेश अरविंद मारगम, यश मधुकर सारंगी, समीर रफिक शेख यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार मालक लकडे व चालक जाधव या दोघांना सोडून सर्वांना अटक करण्यात आली. पोलिस आयुक्तांचे विशेष पथक हे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजयपूर रोड परिसरात रात्रगस्त करीत होते. त्यावेळी शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास हत्तुरजवळील गुलमोहर ऑर्केस्ट्रा अँड बार याठिकाणी साऊंडसिस्टिमचा मोठा आवाज येत असल्याचे दिसून आले.

त्यामुळे विशेष पथकातील कर्मचार्‍यांनी गुलमोहर बार येथे जाऊन पाहणी केली असता बारमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये नृत्यांगनांना नाच करण्यास लाऊन अनेकजण त्यांच्यावर पैसे उडवत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पथकाने बारच्या कागदपत्रांची तपासणी केली असता परवान्यातील अटी व शर्तीचा भंग करुन बेकायदेशीरपणे बार सुरू ठेवल्याचे दिसून आल्याने बारमध्ये असलेल्या सर्व ग्राहकांना अटक करून पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

नृत्यांगनांना जागेवरच नोटीस देऊन सोडून देण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त हरिश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार दिलीप भालशंकर, पोलिस नाईक योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुंखे, नरेंद्र नक्का यांनी केली.

Back to top button