Electric shock death | विजेच्या धक्क्याने 13 वर्षीय मुलीचा मृत्यू File Photo
सोलापूर : शहरातील नीलमनगर येथे विद्युत मोटारीच्या वायरची प्लग पिन काढताना एका 13 वर्षीय शाळकरी मुलीला विजेचा शॉक बसला. त्यात तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
समृद्धी सिद्धेश हिरेमठ (वय 13) असे तिचे नाव आहे. रविवारी सकाळी नळाला पाणी आले होते. पाणी भरून झाल्यानंतर समृद्धी ही विद्युत मोटार बंद करण्यासाठी लाईट बोर्डजवळ गेली. बटण बंद करून सॉकेटमधून प्लग पिन काढताना विजेचा करंट लागल्याने ती
जागेवर बेशुद्ध पडली. बेशुद्ध अवस्थेत तिला शेजारी राहणारे राघवेंद्र कस्तूरे यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. ही घटना रविवारी 27 जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली. सिव्हील पोलिस चौकीत घटनेची नोंद आहे.

