

सोलापूर : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि. 11) जाहीर होणार होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला जाहीर होणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरुवात केल्यापासून विविध तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पसरत आहे. अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातून 47 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ते विद्यार्थी पहिली गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत असताना अचानक पहिली गुणवत्ता यादीची तारीख पंधरा दिवसांनी पुढे ढकलली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्याने नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होत आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया तत्काळ राबवावी, अशी मागणी पालक, विद्यार्थ्यांमधून होत आहे. परंतु प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने त्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेस वेळ लागणार आहे.