Solapur Mega block: 11 तासांचा मेगा ब्लॉक; नऊ रेल्वे रद्द

सोलापूर येथील यार्डातील ब्रिटीशकालिन 103 वर्षांचा रेल्वेच्या ओव्हरब्रीजच्या पुलाचे पाडकाम उद्या रविवार (दि. 14) रोजी होणार आहे
Solapur Mega block
Solapur Mega block: 11 तासांचा मेगा ब्लॉक; नऊ रेल्वे रद्दFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : येथील यार्डातील ब्रिटीशकालिन 103 वर्षांचा रेल्वेच्या ओव्हरब्रीजच्या पुलाचे पाडकाम उद्या रविवार (दि. 14) रोजी होणार आहे. यासाठी या विभागाच्या इतिहासातील रेल्वेचा अकरा तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. रविवार रोजी घेण्यात आलेल्या अकरा तासांच्या या मेगाब्लॉकमुळे या विभागातील नऊ रेल्वे रद्द तर नऊ अन्य मार्गे वळवण्यात आले असून काही गाड्या शॉर्ट टर्मिनेशन केल्या आहेत. तर सोमवार रोजी अडीच तासांच्या ब्लॉकच्या वेळेतील तीन गाड्या रद्द केल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या वेळात बदल केला आहे. येथील रेल्वे विभागाच्या इतिहासातील दीर्घवेळ मेगा ब्लॉकचा हा आजचा दिवस आहे. सकाळच्या सत्रातील सर्व रेल्वे गेल्यानंतर सकाळी 08:30 ते संध्याकाळी 07:30 असे 11 तासांचा हा ब्लॉक असणार आहे. सकाळच्या सत्रानंतर नऊ रेल्वे रद्द केल्या आहेत. 1. होसपेट-सोलापूर 2.सोलापूर- पुणे, 3. सोलापूर-होसपेट, 4. वाडी-सोलापूर डेमू, 5.सोलापूर-दौंड डेमू, 6.हडपसर-सोलापूर डेमू, 7. दौंड-कलबुर्गी डेमू स्पेशल, 8.सोलापूर-कलबुर्गी डेमू, 9.कलबुर्गी-दौंड असे रेल्वे रद्द केल्या आहेत.

वळवलेल्या गाड्या- विजयपुरा-रायचूर ही विजयपुरा-होटगी-वाडीमार्गे, तिरुवनंतपुरम सेंट्रल-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस ही गुंटकल-बल्लारी-होसपेट-गदग-हुबळी-लोंडा-मिरज-पुणेमार्गे वळवली आहे. बंगळुरू-सीएसएमटी मुंबई उद्यान ही गुंतकल-बल्लारी-होसपेट-गदग-हुबळी-लोंडा-मिरज-पुणे मार्गे, सीएसएमटी मुंबई-बंगळुरू उद्यान ही पुणे-मिरज-लोंडा-हुबळी-गदग-होसपेट-बळ्ळारी-गुंटकलमार्गे जाईल. एलटीटी मुंबई-विशाखापट्टणम ही कुर्डूवाडी-लातूर-लातूर रोड-खानापूर-विकाराबादमार्गे धावेल. पुणे-हैदराबाद शताब्दी ही कुर्डूवाडी-लातूर रोड-बीदर-विकाराबाद. असे नऊ रेल्वे या अन्य मार्गे वळवलेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news