

टेंभुर्णी : पुढारी वृत्तसेवा विठ्ठल-हरीनगर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीपराव भोसले, तर व्हॉईस चेअरमनपदी भालचंद्र मिस्कीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चेअरमनपदासाठी दिलीपराव भोसले व व्हाईस चेअरमनपदासाठी भालचंद्र मिस्कीन यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एस. कोळी यांनी काम पाहिले. या संस्थेच्या स्थापनेपासून सर्व निवडी बिनविरोध झालेल्या आहेत. यावेळी ज्येष्ठ नेते गोविंद भोसले, शिंदे कारखान्याचे संचालक विष्णुपंत हुंबे, गोरख मिस्कीन, सदाशिव भोसले, कल्याण भोसले, डॉ. भीमराव पवार, दिगंबर भोसले, उत्तम भोसले, प्रदीप भोसले, माजी सरपंच पद्मिनी भोसले, सचिव अशोक भोसले, सुनील अनपट, माणिक कीर्ते उपस्थित होते. नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक यांचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी अभिनंदन केले.