हंगाम नसताना कराडात कलिंगडची आवक

हंगाम नसताना कराडात कलिंगडची आवक

कराड : हंगाम नसतानाही कराड मध्ये कलिंगडांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. भाजी मंडई तसेच रस्त्यावर कलिंगड विक्रेते दिसत आहेत. प्रतिवर्षी उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी कराड शहरात येत असतात. लाखो रुपयांची उलाढाल या तीन ते चार महिन्यात होत असते. मात्र, सध्या हंगाम नसताना हिवाळ्यामध्येच कलिंगडाची आवक बाजारपेठेत झाली आहे.

भाजी मंडई तसेच रस्त्यावर कलिंगड विक्रेते दिसत आहेत. पन्नास, सत्तर, शंभर रुपये याप्रमाणे कलिंगडाची विक्री केली जात आहे. मागणी जास्त नसली तरी बऱ्यापैकी विक्री होत असल्याचे कलिंगड विक्रेत्यांनी सांगितले. उन्हाळ्या प्रमाणे दर मात्र कलिंगडांना मिळत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news