सातार्‍यात युवकाची आत्महत्या

सातार्‍यात युवकाची आत्महत्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा दोन माणसांच्या सांगण्यावरून पोलिसाने पैसे खाल्ले. त्यामुळे मला तीन महिने शिक्षा झाली, अशी चिठ्ठी लिहून एका तरूणाने गळफास घेतला आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली असून उमेश रमेश जाधव (वय 34, रा. रविवार पेठ, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातार्‍यातील रविवार पेठेमधील एका अपार्टमेंटमध्ये उमेश जाधव हा वास्तव्यास होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती.

या प्रकरणात तो तीन महिने कारागृहात होता. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता. शनिवारी दुपारी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशामध्ये पोलिसांना चिठ्ठी सापडल्यानंतर आत्महत्या पाठीमागचे धक्‍कादायक कारण समोर आले.

दरम्यान, माझी पत्नी आईकडे गेली होती. परत आल्यानंतर तिने आत्महत्या केली. याला कारण एक महिला आणि पुरुष आहे. त्या दोघांमुळे मी आत्महत्या करतोय. मला जेलमध्ये टाकण्यासाठी त्या दोघांनी एका पोलिसाला पैसे दिले. त्यामुळे मला शिक्षा झाली. आता त्या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, असे आत्महत्यापूर्वी उमेश जाधवने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. अगोदर पत्नी, आता पतीने आत्महत्या केल्याने पूर्ण कुटूंब उद्ध्वस्त झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news