सातारा : सामाजिक सहभागातून बोपर्डी शाळेची प्रगती ; गौडा

सातारा : सामाजिक सहभागातून बोपर्डी शाळेची प्रगती ; गौडा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेची बोपर्डी शाळा ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील शाळा आहे. समाजाच्या सहभागातून शाळेने प्रगती केली आहे. उत्तरोत्तर शाळेच्या कार्याचा आलेख उंचावत जाईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.

बोपर्डीच्या जि.प. शाळेत शाळा प्रवेशोत्सव, नवगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तके वितरण कार्यक्रम विनय गौडा यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी व मान्यवर उपस्थित होते.

शाळेमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले. जागतिक मल्लखांब दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्लखांब व रोप मल्लखांबाची प्रत्यक्षिके सादर केली. यावेळी शबनम मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास सरपंच सौ. प्राजक्ता वनारसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन वनारसे, ग्रामपंचायत सदस्या साधना गाढवे, गिरीष गाढवे,अर्जुन गाढवे, आशा गाढवे, सुनील भिंताडे व पालक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news