सातारा : रामराजेंचे डाव शकुनी मामापेक्षा कपटी : खा. रणजितसिंह

सातारा : रामराजेंचे डाव शकुनी मामापेक्षा कपटी : खा. रणजितसिंह
Published on
Updated on

साखरवाडी : पुढारी वृत्तसेवा : माझ्या विरोधात रामराजेंनी शकुनी मामापेक्षा अधिक कपटी डाव टाकले. मात्र, मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते सर्व डाव हाणून पाडले असल्याचा घणाघात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केला.

साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित साखरवाडी जिल्हा परिषद गटाच्या संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे- पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच अक्षय रुपनवर, माजी सरपंच विक्रम भोसले, पांडुरंग भोसले, सुरेश भोसले उपस्थित होते.

खा. रणजितसिंह म्हणाले, तालुक्यामध्ये राजे कुटुंबियांनी नवीन एकही संस्था काढली नसून श्रीराम साखर कारखाना जवाहर उद्योग समूहाला चालवायला दिला आहे. मालोजी बँक बुलढाणा बँकेला चालवायला दिली असल्याचा आरोप करुन ते म्हणाले, जे काम ज्याने केले आहे त्याला ते श्रेय मिळाले पाहिजे.

फलटण तालुक्यामध्ये होऊ घातलेली नवीन एमआयडीसी, निरा देवधर, धोम बलकवडीचा पाणी प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल त्याचबरोबर चोरीला गेलेले डीपी परत बसले असतील तर हे सर्व कामे मी केली म्हटले तर चालेल का? त्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे योगदान असून भविष्यात या भागामध्ये अजून महत्त्वाची कामे या मतदारसंघांमध्ये करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सूत्रसंचलन हरिदास सावंत यांनी केले. यावेळी साखरवाडी जिल्हा परिषद गटातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news