सातारा : नुने येथे गॅस सिलिंडरचा ट्रक पलटी

सातारा : नुने येथे गॅस सिलिंडरचा ट्रक पलटी
Published on
Updated on

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : नुने, (ता. सातारा) येथील सातारा- मेढा रस्त्यानजीक असलेल्या भारत गॅस गोडाऊनजवळ गॅस सिलिंडरचा ट्रक रस्त्याशेजारील नाल्यात पलटी झाला. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गॅस सिलेंडरचा ट्रक (क्र. एमएच ११ सीएच ५६५६) वाई येथून आला होता. नुनेनजीक असलेल्या भारत गॅसच्या गोडाऊनमध्ये सिलेंडरच्या टाक्या खाली करण्यात येणार होत्या. मुख्य रस्त्यावरून रिव्हर्सने गोडाऊनकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ट्रक पलटी झाला. यामुळे ट्रकमधील सिलेंडरच्या टाक्या नाल्यात अस्ताव्यस्त पडल्या होत्या. अपघातस्थळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या बघ्यांनी गर्दी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news