

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातार्यातील दस्त नोंदणी कार्यालयात बुधवारी जेवणाचा 'बेत' झाला. कर्मचार्यांनी बाहेरुन बिर्याणी आणून खाल्ल्याने त्याची चर्चा झाली. सरकारी कार्यालयात मांसाहारी जेवण केल्यामुळे काहीजणांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली
आहे.
सातारा तालुक्याची दस्त नोंदणी कार्यालये पोवई नाक्यावरील सातारा प्रांत कार्यालय परिसर व गोडोली येथे आहेत. या कार्यालयात नेहमीप्रमाणे कामानिमित्त येणार्या नागरिकांची वर्दळ होती. पोवई नाक्यावरील कार्यालयात सकाळचे कामकाज संपल्यानंतर दुपारी जेवणाची सुट्टी झाली. यावेळी काही कर्मचार्यांनी जेवणाचे डबे आणले नव्हते.
जेवणासाठी बाहेर जाण्याऐवजी कार्यालयात जेवण मागवू या हेतूने संबंधित कर्मचार्यांनी दुपारच्या जेवणासाठी कार्यालयात बिर्याणी आणली. या जेवणाचा 'बेत' सुरू असताना कामानिमित्त आलेल्या काहीजणांनी याचे शूटिंग केले. कार्यालयात कर्मचार्यांकडून संमिश्र जेवणाच्या पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे झाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी सह जिल्हा निबंधक बी. के. खांडेकर यांना विचारले असता ते म्हणाले, कामानिमित्त बाहेर असल्याने याप्रकरणाची माहिती घेतली. काही कर्मचार्यांनी जेवणाचे डबे आणले नव्हते. त्यामुळे दुपारच्यावेळी कर्मचार्यांनी बाहेरुन जेवण आणल्याचे त्यांनी सांगितले.