सातारा : ठाण्यातच महिला पोलिसाच्या मनगटाचा घेतला चावा

सातारा : ठाण्यातच महिला पोलिसाच्या मनगटाचा घेतला चावा
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा शहर पोलिस ठाण्यात दोन गट तक्रार द्यायला आल्यानंतर त्यांच्यामध्ये ठाण्यातच झंगाडपकाड सुरू झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून संशयितांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी एका महिलेने महिला पोलिसाच्या मनगटाचा चावा घेत खळबळ उडवून दिल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान, पोलिसांनी सहा जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

जावेद सय्यद, पूजा सय्यद, अक्षय शिवगण, अमृता शिवगण, जया शिवगण, पूजा शिवगण (सर्व रा. सदरबझार व रविवार पेठ सातारा) यांच्याविरुद्ध महिला पोलिस पूजा थोरात यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 10 रोजी रात्री उशिरा घडली आहे. यातील संशयित आरोपी हे एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, यावेळी संशयित पोलिस ठाण्यात आल्यानंतरही ते भांडत होते. वाद होऊ नये, यासाठी पोलिस सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत असताना संशयित भिडले. यामुळे तक्रारदार महिला पोलिसासह इतर पोलिस भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करू लागले.

यावेळी संशयितांपैकी एका महिलेने तक्रारदार महिला पोलिसाच्या मनगटाचा चावा घेतला. याचवेळी दुसर्‍या एका संशयिताने पोलिस ठाण्यातील काचेवर डोके आपटून काचेचे नुकसान केले. पोलिस ठाण्यात दोन गटाचा धुडगूस झाल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांविरुध्द शासकीय कामात अडथळ्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news