सातारा : कालगाव विभागाला अखंडीत वीज मिळेल

सातारा : कालगाव विभागाला अखंडीत वीज मिळेल
Published on
Updated on

मसूर; पुढारी वृत्तसेवा : कालगांव येथे नव्याने अतिरिक्‍त 33 केव्ही विद्युत लाईन जोडणी काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील कृषीपंप धारक शेतकर्‍यांना महावितरण देत असलेल्या वेळेमध्ये अखंडीत वीज पुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शेतीसह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या माध्यमातून मार्गी लागण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन आदरणीय पी.डी.पाटील साहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील यांनी केले.

राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून महावितरणचे कृषी धोरण 2020 अंतर्गत पेरले ता.कराड येथील सब स्टेशन करिता कालगांव येथे आठ कि.मी.अंतरात 33 केव्ही विद्युत लाईन जोडणी कामाचे भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सागर पाटील म्हणाले, परिसरातील कृषीपंप धारक शेतकर्‍यांनी महावितरण पुरवत असलेल्या वेळेमध्ये अखंडित वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांचेकडे मागणी केली होती. त्यास अनुसरून ना. बाळासाहेब पाटील यांनी महावितरणमार्फत 33 केव्हीच्या सबस्टेशनकरीता आठ किलोमीटर अंतरात स्वतंत्र विद्युत जोडणी करावी यासाठी विशेष प्रयत्न केले असून, नव्याने आठ किलोमीटर अंतरात स्वतंत्र विद्युत लाईन जोडणीच्या कामाचा आज शुभारंभ होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पेरले, कालगांव व परिसरातील कृषीपंप धारक शेतकर्‍यांना अखंडित वीजपुरवठा होणार आहे.

याप्रसंगी माजी जि.प. सदस्या सौ.सुरेखा जाधव, पं.स. सदस्य रमेश चव्हाण, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक पै.संजय थोरात, लालासाहेब पाटील, शहाजीराव चव्हाण, आदरणीय पी.डी. पाटील साहेब सहकारी बँकेचे संचालक उमेश कदम, प्रतापराव चव्हाण, सयाजीराव चव्हाण, मिलिंद चव्हाण, कालगावच्या सरपंच सौ.संगीता चव्हाण, योगेश चव्हाण, दिलीपराव चव्हाण, जयवंतराव चव्हाण, अभिजीत पाटील, विलास खांबे, भरत माने, आण्णा पाटील, पोपट मोरे, मंगेश भोसले, तानाजी फडतरे, महेश निकम, सुजित चव्हाण, सह्याद्रि कारखान्याचे संपर्क प्रमुख आर.जी.तांबे, महावितरणचे अधिकारी कुंभार, माळवदे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news