सातारा : अवैध दारू वाहतूक करणार्‍याला अटक

सातारा : अवैध दारू वाहतूक करणार्‍याला अटक

वेणेगाव : पुढारी वृत्तसेवा : देशमुखनगर ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकीवरून अवैध दारू विक्री करणार्‍या एकावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सूरज तानाजी कदम (वय 29, रा. कोपर्डे ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

सूरज कदम हा देशमुखनगरच्या हद्दीत अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार देशमुखनगरमध्ये पोलिसांनी सापळा रचत सूरज कदम याला मुद्देमालासह अटक केली. त्याच्याकडून 3 हजार रूपयांच्या 100 दारूच्या बाटल्या व दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई सपोनि चेतन मछले, पोलीस नाईक दादा स्वामी, कपिल टिकोळे, संजय जाधव, विशाल जाधव यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news