शिंदेसाहेबांचे काय होणार? दरे ग्रामस्थांचे लक्ष कोयना विभागाचे लक्ष राजकीय घडामोडींकडे

शिंदेसाहेबांचे काय होणार? दरे ग्रामस्थांचे लक्ष कोयना विभागाचे लक्ष राजकीय घडामोडींकडे
शिंदेसाहेबांचे काय होणार? दरे ग्रामस्थांचे लक्ष कोयना विभागाचे लक्ष राजकीय घडामोडींकडे

बामणोली : पुढारी वृत्तसेवा राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जेव्हापासून बंड पुकारले तेव्हापासून त्यांचे मुळगाव असलेल्या दरे तर्फ तांब गावातील लहान, थोर मंडळी शिंदे साहेबांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. आता पुढे काय होणार? या चिंतेत गावकरी आहेत. ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सर्वच ग्रामस्थ टिव्हीकडे डोळे लावून सातत्याने बातम्या ऐकत असून आता राज्याच्या राजकारणात गावचा सुपुत्र काय चमत्कार घडवणार याकडेही त्यांचे लक्ष आहे. जेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे साहेबांच्या माध्यमातून घडामोडी घडायला सुरुवात झाली तेव्हापासून नुसते दरे गावच नाही तर संपूर्ण कोयना भाग 105 गावात फक्त आपल्या परिसरातील गावचे सुपुत्र ना. एकनाथ शिंदे यांच्याच नावाची चर्चा होत आहे. सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरू असतानादेखील सर्वजण टीव्हीकडे एकटक डोळे लावून बसले आहेत.

कॅबिनेट मंत्री असतानाही गावाकडील ओढ कायम.

मुळ गाव दरे तर्फ तांबचे ग्रामदैवत जननीदेवीच्या

वार्षिक यात्रेला दरवर्षी सहकुटुंब हजेरी.

उतेश्वर येथील श्री उतेश्वराच्या वार्षिक यात्रेला दरवर्षी हजेरी.

गावातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण.

ग्रामदैवत जननीदेवीच्या नवीन मंदिर उभारणीत योगदान.

दरे गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.

बामणोली ते दरे दरम्यान नवीन तराफा(बार्ज)सेवा मंजूर.

शिवसागर जलाशयावर नवीन पूल मंजूर. या पुलावर

पर्यटकांसाठी काचेची प्रेक्षा गॅलरी उभारण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news