व्यसनमुक्‍त युवक संघाची हुतात्मा स्मारक ते धावडशी पदयात्रा
व्यसनमुक्‍त युवक संघाची हुतात्मा स्मारक ते धावडशी पदयात्रा

सातारा : व्यसनमुक्‍त युवक संघाची हुतात्मा स्मारक ते धावडशी पदयात्रा

सातारा : पुढारी वृत्तसेवा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने क्रांतीविरांगणा राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हुतात्मा स्मारक फाशीचा वड सातारा ते राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरगाव असलेल्या धावडशी अशी पदयात्रा काढली. पदयात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

या पदयात्रेची सकाळी 7 वा. राष्ट्रगीत व प्रार्थनेने हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. मोळाचा ओढा, कोंडवे, हामदाबाज, नेले, किडगाव या मार्गाने पदयात्रा धावडशीत पोहचली. धावडशी गावचे सरपंच राजेंद्र पवार, उपसरपंच दिलीप पवार, चेअरमन प्रभाकर पवार, ह.भ.प. कोर्कीर्ंंळ महाराज, पोलिस-पाटील जोतिराम पवार, हर्षल तांबे यांच्यासह वारकरी व ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर पदयात्रेचे स्वागत केले.

लेझिम व ढोल-ताशाच्या गजरात रथामधे राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा ठेवून श्री ब्रम्हेंद्रस्वामीमंदिरा पर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी ह.भ.प बंडातात्या कराडकर, व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक विलासबाबा जवळ, जगन्नाथ शिंदे, पोनि अभिजीत घोडके, मुख्याध्यापक सुनिल चौधरी, अनिल जायकर उपस्थित होते. सूत्रसंचलन बाळासाहेब शेरेकर यांनी केले. आभार संघटनेचे अध्यक्ष दिपक जाधव यांनी मानले.

logo
Pudhari News
pudhari.news