नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना; मानसिंह चव्हाण यांनी सिंहगडावरील कडा रात्री केला सर

नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना; मानसिंह चव्हाण यांनी सिंहगडावरील कडा रात्री केला सर

कराड : पुढारी वृत्तसेवा : माघ नवमी ही नरवीर तानाजी मालुसरे यांची ३५३ वी पुण्यतिथी. याच दिवशी सिंहगड किल्ला जिंकला, पण, त्यांना वीरमरण आले. जो डोणागिरी कडा सर करून तानाजी मालुसरे अष्टमीच्या रात्री किल्ल्यावर गेले होते, त्याच काळोख्या रात्री हा कड़ा सर करून कोणेगावचे गिर्यारोहक मानसिंह चव्हाण यांनी त्यांना अनोखी मानवंदना दिली.

आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणत तानाजी मालुसरे यांनी उदयभान राठोड या किल्लेदारावर हल्ला केला. घनघोर युद्धात तानाजी मालुसरे यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे, वयानं जेष्ठ शेलार मामा व अन्य मावळ्यांनी गड ताब्यात घेतला. मात्र तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडले.

याच प्रसंगामुळे कोंढाणा किल्याला सिंहगड असे नाव पडले. जो डोणागिरी कडा सर करून तानाजी मालुसरे अष्टमीच्या रात्री किल्ल्यावर गेले होते, त्याच काळोख्या रात्री हा कड़ा सर करून कोणेगावचे गिर्यारोहक चव्हाण यांनी सिंहगडावर जाऊन त्यांना अनोखी मानवंदना दिली. रात्री बारा वाजता चढण्यास सुरू करून पहाटे चार वाजता ते किल्ल्यावर पोहोचले. त्यांच्यासह गिर्यारोहक लहू उघडे, कृष्णा मरगळे, तुषार दिघे यांनी सुद्धा मोहीम यशस्वी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news