जिल्ह्यात गणेशोत्सवाची चाहूल

जिल्ह्यात गणेशोत्सवाची चाहूल
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा लाडक्या बाप्पांचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांसह गणेशभक्तांना गणेशोत्सवाची चाहूल लागली असून उत्सवपूर्व नियोजनांना वेग आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मंडप उभारणीसह वर्गणी, उत्सवकाळातील विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी बैठकांचा धडाका सुरु आहे. अगाऊ नोंदणी केलेल्या मूर्तींचे काम लवकरात लवकर उरकण्याची लगबग कुंभारवाड्यात सुरु झाली आहे.

गणेशोत्सव म्हणजे उत्साहाची पर्वणीच असते. यावर्षीचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. सर्वच गणेश भक्तांमध्ये उत्सवपूर्व नियोजनाला वेग आला असल्याने जिल्ह्यात गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. दि. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या काळात गणेशोत्सव साजरा होणार आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे साधेपणाने व थोडक्या प्रमाणात साजरा करण्यात आला. मात्र या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने गणेश भक्तांचा उत्साह दुणावला आहे. शहरासह गावोगावच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांमध्ये उत्सवकाळातील कामांच्या नियोजनांसाठी बैठकांचा धडाका सुरु आहे.

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दहा दिवस बाप्पांचा मुक्काम असून या काळात गणेशभक्तांकडून उपासना केली जाणार आहे. सार्वजनिकसह घरगुती गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या बुकिंग केलेल्या गणेशमूर्तींचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कुंभारवाड्यात लगबग सुरु आहे. घरगुती बाप्पांच्या मूर्तीही स्टॉलवर दाखल होवू लागल्या आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात काही गणेश मंडळांनी आपल्या बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. गणेशमंडळांची मंडप उभारणी, वर्गणी जमा करणे, उत्सवकाळातील विविध जबाबदार्‍यांचे नियोजन करुन कामांची विभागणी करण्यात येत आहे. तसेच सजावट साहित्य व बाजारपेठेची चाचपणी करुन नाविन्याचा शोध घेतला जात आहे. व्यापारी व व्यावसायिकांसह बाजारपेठेला गणेशोत्सवाची चाहूल लागल्याने तीही गणेशोत्सवासाठी सज्ज होवू लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news