कराड : रेठरे बु. येथे मगरीचे दर्शन

कराड : रेठरे बु. येथे मगरीचे दर्शन
Published on
Updated on

रेठरे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील घोडके मळी येथील नदीपात्रात मगरीचे दर्शन घडले. पाण्यातून बाहेर येऊन मगर नागरी वस्तीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, लोक जमा झाल्यानंतर ती पुन्हा नदीपात्रात गेली. मगरीला पकडण्यासाठी वन विभागाने सापळा लावला आहे.

महादेव घोडके यांच्या शेतातून मगरीची वाटचाल नागरी वस्तीकडे होत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. त्यांनी वन विभागाला कळवले. दरम्यान, मगर पुन्हा नदीपात्रात गेली. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी तिला पकडण्यासाठी त्या परिसरात सापळा लावला आहे. पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी नदीपात्रात मगरचे दर्शन ग्रामस्थांना घडले होते. काही दिवस गायब असलेली मगर पुन्हा नदीपात्रातून बाहेर येत असून ती नागरी वस्तीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने वनविभागाने तिचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news