Satara Accident News: जोशीविहीर येथे अपघातात युवक ठार

पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकला धडकून फरफटत गेली
Satara Accident News |
Satara Accident News: जोशीविहीर येथे अपघातात युवक ठारPudhari Photo
Published on
Updated on

भुईज : सातारा- पुणे महामार्गावर जोशिविहीर येथील उड्डाण पुलावर दुचाकी दुभाजकाला घसरून फरकटत गेल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. अविनाश अशोक शेडगे (वय 30, रा. हणबरवाडी. ता. कराड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास जोशिविहीर पुलावरून अविनाश हा सातारा बाजूकडे निघाला होता. यावेळी पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकला धडकून फरफटत गेली. यामध्ये अविनाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत अविनाशला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news