राजकीय पटलावर महिलाराज मजबूत होणार

फलटण तालुक्यात भावी सरपंचांच्या चेहर्‍यावर हसू : अनेकांचे स्वप्न धुळीस
राजकीय पटलावर महिलाराज मजबूत होणार
File Photo
Published on
Updated on

फलटण : फलटण तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींपैकी 66 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्याने तालुक्याच्या राजकीय पटलावर महिलाराज मजबूत होणार आहे. आरक्षण सोडत जाहीर होताच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काही भावी सरपंचांच्या चेहर्‍यावर हसू उमटले तर अपेक्षित आरक्षण न पडल्यामुळे अनेकांचे चेहरे हिरमुसले. आरक्षण सोडतीने गाव कारभारी बनण्याचे बहुतेकांचे स्वप्न धुळीस मिळाले. तालुक्यातील मोठ्या आणि संवेदनशील असलेल्या कोळकी व विडणी ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुले झाल्याने येथे संघर्ष पाहावयास मिळणार आहे.

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारी प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. आरक्षण सोडतीमध्ये 131 ग्रामपंचायतींपैकी 66 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज येणार आहे. अनुसूचित जमाती (खुला 1) ढवळेवाडी (आसू). अनुसूचित जाती महिला (10) पवारवाडी, विंचुर्णी, आसू, मुंजवडी, दालवडी, शिंदेनगर, खुंटे, राजुरी भवानीनगर, हनुमंतवाडी, सस्तेवाडी. अनुसूचित जमाती सर्वसाधारण (9) जिंती, वेळोशी, गोखळी, सरडे, निंभोरे, गुणवरे, निंबळक, खामगाव, निरगुडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (18) झडकबाईचीवाडी, शेरेशिंदेवाडी, धुळदेव, गोळेवाडी, ठाकूरकी, भाडळी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, काशीदवाडी, तरडगाव, वाखरी, बोडकेवाडी, खडकी, फरांदवाडी, बरड, धुमाळवाडी, मिरगाव, शिंदेमाळ, तांबवे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला (17) मलवडी, कुसुर, उपळवे, पाडेगाव, आदर्की बुद्रुक, रावडी बुद्रुक, साठे, तरडगाव, हिंगणगाव, राजाळे, जोर (कुरवली खुर्द), मठाचीवाडी, नाईकबोंबवाडी, वाघोशी, घाडगेमळा, आदर्की खुर्द, सोनगाव.

खुला प्रवर्ग महिला (38) जावली, ढवळ, भिलकटी, झिरपवाडी, साखरवाडी, भाडळी खुर्द, कुरवली खुर्द, शिंदेवाडी, आळजापूर, वडले, चौधरवाडी, आंदरुंड, खराडेवाडी, सोमंथळी, कांबळेश्वर, कापसी, आरडगाव, अलगुडेवाडी, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, चांभारवाडी, सालपे, सासवड, तावडी, जाधववाडी (फ), मिरेवाडी (कुसुर), शेरेचीवाडी (ढवळ), घाडगेवाडी, माळेवाडी, ढवळेवाडी (निंभोरे), पिराचीवाडी, टाकुबाईचीवाडी, माझेरी, हरहर बुद्रुक, परहर खुर्द, जोर (वाखरी).

खुला प्रवर्ग (38) सांगवी, गिरवी, खटकेवस्ती, सुरवडी, सासकल, होळ, कुरवली बुद्रुक दत्तनगर, विडणी, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, टाकळवाडे, कोळकी, मुरूम, दुधेबावी, बीबी, पिंप्रद, शेरेचीवाडी (हिं), तिरकवाडी, नांदल, मिरढे, फडतरवाडी, चव्हाणवाडी, वाठार (निं), कोरेगाव, वडजल, जाधववाडी (आसू), मुळीकवाडी, मिरेवाडी (दालवडी), कोर्‍हाळे, डोंबाळवाडी, विठ्ठलवाडी, मानेवाडी, जाधवनगर, दर्‍याचीवाडी, सावंतवाडी, उळुंब, गोळेगाव.

आरक्षण सोडतीसाठी निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे नायब तहसीलदार तुषार गुंजवटे तलाठी संघाचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे व त्यांच्या टीमने सहकार्य केले आरक्षण सोडतीच्या वेळी तालुक्यातील गाव पुढारी उपस्थित होते प्रारंभी तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांनी आरक्षण सोडती विषयी माहिती सांगितली उपस्थित समुदायातून उपस्थित केलेल्या शंकांचे निरक्षण तहसीलदार जाधव यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news