Satara Accident News |
Satara Accident News | चारचाकीच्या धडकेत पत्नी ठारFile Photo

Satara Accident News | चारचाकीच्या धडकेत पत्नी ठार

पती जखमी : चालक अपघात स्थळावरून पसार
Published on

मारूल हवेली : कराड- पाटण मार्गावर दिंडुकलेवाडी येथे भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाली तर पती जखमी झाला. हा अपघात मंगळवार दि.13 रोजी घडला असून सदर घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे.

सरिता नाना देसाई (वय 57) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती नाना परशुराम देसाई (वय 60 येराडवाडी ता.पाटण) हे जखमी झाले आहेत. ते कामानिमित्त मल्हारपेठ येथे जाताना अपघात झाला.

मल्हारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना देसाई हे पत्नी सरिता यांच्या सोबत मोटारसायकल (एम.एच.50 वाय 0967) वरून जात होते. कराड-पाटण मार्गावरील दिंडुकलेवाडी गावच्या हद्दीत सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास चारचाकीने (एम.एच.42 एम 2468) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात सरिता देसाई यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नाना देसाई हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक पळून गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news