

सातारा : विठ्ठल हेंद्रे
सोशल मीडियावरील (सामाजिक माध्यमांवर) फेसबुक, इन्स्टाग्राम यावर जातीय तेढ वाढू नये व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर वॉच ठेवून तत्काळ त्या पोस्ट डिलीट व्हाव्यात. यासाठी सातारा पोलिस दलाने ‘सोशल मॉनिटरिंग सेल’ची स्थापना केली आहे. वर्षभरात जिल्ह्यात असे 8 गुन्हे दाखल झाले असून, 18 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
प्रतापगड, पुसेसावळी, विलासपूर, चंदन-वंदन प्रकरणात सामाजिक सलोखा
सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात प्रतापगड, पुसेसावळी, विलासपूर व चंदन-वंदन ही ठिकाणी सामाजिक सलोख्यातून चर्चेत राहिली आहेत.
प्रतापगड येथे अफजलखान कबरीवरील अतिक्रमण हटवण्यात आले. पुसेसावळीत जातीय दंगल होवून एकाचा निर्घृण खून करण्यात आला.
सातार्यातील विलासपूर येथे इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढून जातीय तेढ होईल असा प्रकार झाला.
नुकतेच चंदन-वंदन गडावर पुरातन वास्तू सापडल्यावरुन व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले. या सर्व घटनेत सातारा पोलिसांनी सोशल मीडियावर वॉच ठेवून त्या त्यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या.सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात प्रतापगड, पुसेसावळी, विलासपूर व चंदन-वंदन ही ठिकाणी सामाजिक सलोख्यातून चर्चेत राहिली आहेत.
प्रतापगड येथे अफजलखान कबरीवरील अतिक्रमण हटवण्यात आले. पुसेसावळीत जातीय दंगल होवून एकाचा निर्घृण खून करण्यात आला. सातार्यातील विलासपूर येथे इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढून जातीय तेढ होईल असा प्रकार झाला.नुकतेच चंदन-वंदन गडावर पुरातन वास्तू सापडल्यावरुन व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले. या सर्व घटनेत सातारा पोलिसांनी सोशल मीडियावर वॉच ठेवून त्या त्यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या.
सध्या महाराष्ट्रात जातीय तेढ वाढीच्या घटना कमालीच्या वाढू लागल्या आहेत. यासाठी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. आभासी दुनियेत अनेकजण ऑनलाईन असतो. त्यामुळे सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर ती लाखोजण पाहतात. एखाद्याने पोस्ट केल्यानंतर त्यावर व्यक्त होणार्यांचीही संख्या लक्षणीय असते. यातून अनेकदा तेढ वाढण्याच्या घटना घडतात. वास्तविक मूळ पोस्ट टाकणार्याची ती माहिती कितपत खरी? हा संशोधनाचा विषय असतो. मात्र आपल्या जातीबद्दल तसेच महापुरुषांबद्दल पोस्ट झाली की त्यातून डोकी भडकतात व गोंधळ निर्माण होतो.
सातारा शहरासह जिल्ह्यात देखील जातीय तेढ वाढण्याचे प्रमाण वाढू लागल्याने 2023 साली पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनव संकल्पना राबवत सोशल मॉनिटरिंग सेलची स्थापना केली. या सेलने पहिल्या वर्षात चांगले काम केले असून आणखी गती वाढवल्यास समाज माध्यमांवर जातीय तेढ निर्माण करणार्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोशल मॉनिटरिंग सेलची स्थापना प्रत्येक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दररोज एका पोलिसाकडे याची जबाबदारी दिली जाते. संबंधित पोलिसाने सोशल मीडियावर आपल्या हद्दीत तसेच जिल्ह्यात कुठे कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल अशी कोणी पोस्ट केली आहे का? ती पोस्ट फॉरवर्ड होत आहे का? पोस्ट कोणत्या विषयाबाबत आहे? याची माहिती घेतली जाते. त्या त्यानुसार त्या पोस्टची माहिती सायबर सेलला देवून त्याची अधिक तांत्रिक माहिती घेतली जाते. सर्व तांत्रिक तपास झाला की आक्षेपार्ह पोस्ट करणार्यावर सोशल मॉनिटरिंग सेलद्वारे कारवाईचा बडगा उगारला जातो.