Wai News : एमआयडीसीतील पोलिस चौकी कर्मचाऱ्यांविनाच

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर : अवैध धंद्यांना मिळतेय बळ
Police Dial 112
Police StationFile Photo
Published on: 
Updated on: 

वाई : खंडाळ्याप्रमाणे वाई एमआयडीसीतही मोठया प्रमाणात उद्योग व कंपन्या आहेत. मात्र, या ठिकाणी असलेल्या पोलिस चौकीत एकही पोलिस कर्मचारी नसल्याने पोलिस चौकी कर्मचाऱ्यांविना सुनीसुनी पडली आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच परप्रांतीयांकडून राजरोसपणे अवैध धंदे होत केले जात आहे. त्यामुळे वाई एमआयडीसीच्या पोलिस चौकीला वाली कधी मिळणार? असा सवाल केला जात आहे.

वाई तालुक्यातील एमआयडीसी ही वाई तालुक्याची आर्थिक जीवनवाहिनी मानली जाते. हजारो नागरिक इथे रोज कामासाठी येतात. लाखोंच्या किंमतीचा माल आयात-निर्यात होतो आणि हे सगळं सुरक्षेविनाच सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी उद्योग मंत्री या ठिकाणी दौरा करून गेले आहेत परंतु या एमआयडीसीत काही सुधारणा झालेली दिसत नाही. वाई एमआयडीसी रामभरोसे सोडून दिली काय? असाही सवाल केला जात आहे.

पोलिस चौकीत कर्मचारीच नसल्याने कामगारांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. यासाठी पोलिस अधीक्षकांनीच यांनीच लक्ष घालून पोलिसांची नेमणूक करणे आवश्यक आहे. अन्यथा एमआयडीसीमध्ये होणाऱ्या चोऱ्या, मारामारीचे प्रकार थांबणार नाहीत. त्यामुळे पोलिस चौकी केवळ शोपीस न ठेवता ती कार्यक्षम करावी, अशी मागणी होत आहे.

वाई, पाचगणी महाबळेश्वर जावली शेकडो सुशिक्षित बेकार तरुण रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. पण एमआयडीसीमधील कंपन्या बाहेरून मजूर आणतात. येथील एमआयडीसींमध्ये परप्रांतीयांचे मोठमोठ्या कंपन्या मधून मोठमोठे ठेके आहेत मात्र स्थानिकांची हेळसांड केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news