Jaykumar Gore | वाईची निवडणूक पक्ष चिन्हावरच लढणार : ना. जयकुमार गोरे

पालिकेसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा
Jaykumar Gore |
मंत्री ना. जयकुमार गोरेPudhari Photo
Published on
Updated on

वेलंग : वाई नगरपालिकेची निवडणूक भाजप पक्ष स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावरच लढवणार आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्षपदांच्या इच्छुकांची नावे मुंबईला पाठवण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठी उमेदवारांची यादी अंतिम करणार आहेत. पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

वाई नगरपालिकेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ना. जयकुमार गोरे यांनी वाईत येऊन भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच पालिका निवडणुकीसाठी भाजपमधून इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती जाणून घेतली.

या बैठकीस मदनदादा भोसले, जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, शहराध्यक्ष विजय ढेकाने, उपशहराध्यक्ष अमित वनारसे, तेजस जमदाडे, सुनील साठे, प्रशांत नागपूरकर, सचिन घाटगे, शुभदा नागपूरकर, भारती कुलकर्णी, माजी नगरसेविका रूपाली वनारसे, ज्येष्ठ नेते दिलीप शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ना. गोरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार असले तरी भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. वाईतही पक्ष चिन्ह असणार असून मित्र पक्षांचा यावेळी सन्मान करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी पक्षांच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करावेत. पक्षाचा प्रोटोकॉल वेगळा असून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या उमेदवाराच्या नावाचा विचार केला जाणार आहे.

अनिल सावंत यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पक्ष श्रेष्ठीच नाव जाहीर करतील. नगरसेवक पदाचे उमेदवारसुद्धा फिक्स केलेले आहेत. अनेकांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या असून त्यांची नावे सुद्धा वेळ आल्यावरच जाहीर होणार आहेत. विरोधकांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यावरच भाजप आपला पत्ता उघडणार आहे. सध्या भाजप वेट अँड वॉच या भूमिकेत आहे. तरीही नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप मात्र मित्र पक्षांना बरोबर घेऊनच निवडणूक लढवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news