

सातारा : सातारा शहरात होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. परंतु, या निवडीवर वाद निर्माण झाला आहे. या निवडीस प्रागतिक साहित्य पंचायत महाराष्ट्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने विरोध केला आहे.
पार्थ पोळके, शिवाजी राऊत, विजय निकम, गणेश कारंडे, चंद्रकांत खंडाईत, अस्लम तडसरकर, बाळासाहेब सावंत, प्रा. दत्ताजीराव जाधव, सिध्दार्थ खरात, संजय नितनवरे, गणेश कारंडे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, विश्वास पाटील साहित्यिक म्हणून योग्य नाहीत. त्यांचे साहित्य त्यांच्याच भावाचे वा:डमयचौर्य साहित्य आहे. त्यांच्या भावाने प्रसिध्दी माध्यमांवर तसे जाहीर केले आहे. बर्याच अंशी कल्पनेच्या ढांडोळ्या घेतलेल्या ऐतिहासिक कादंबरीशिवाय प्रभावीपणे मराठीत त्यांचे योगदान नाही. ऐतिहासिक कादंबर्या विषमता, वंशवाद व जातीय मानसिकतेची मांडणी करणार्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीची 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीला विरोध असल्याचे पत्रकात म्हटले आहे.