

Heavy Rainfall Mahabaleshwar
सातारा : महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. महाबळेश्वर मध्ये सुरु असलेल्या दमदार पावसामुळे वेण्णा लेक हा यावर्षी जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरल्याने लेकच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात हा तलाव भरला होता. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही शहरांचा पाणी प्रश्न मिटला आहे.