Eknath Shinde | किल्ले वासोटा रोपवे जलाशयाच्या पलीकडूनच होणार : उपमुख्यमंत्री शिंदे

पर्यटनाला मिळणार चालना
Eknath Shinde
Eknath ShindeFile Photo
Published on
Updated on

बामणोली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मुनावळे ते किल्ले वासोटा रोपवेची पाहणी केली. किल्ले वासोटा पायथा मेट इंदवली येथे बोटीतून जाऊन त्यांनी रोपवे कसा व कोठून कोठे करायचा, याबाबतची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलाशयाच्या पलीकडूनच रोप वे होणार असल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री शिंदे हे यांचे मूळ गाव असलेल्या दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे तीन दिवस मुक्कामी आहेत. शनिवारी त्यांनी विविध विकास प्रकल्पांची पाहणीही केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर स्थित कराडचे उपसंचालक किरण जगताप, सहायक वनसंरक्षक वन्यजीव बामणोली बाबा हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी बामणोली विजय बाठे, जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ, महाबळेश्वर पंचायत समिती उपसभापती संजय मोरे, सचिन कदम यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, किल्ले वासोटा रोपवे झाल्याने येथील पर्यटनात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. येथील स्थानिक बोटचालकांनाही रोजगार मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news