Satara Crime: वराडेतील ‌‘शुक्रतारा‌’वर वेश्या व्यवसाय

पोलिसांचा छापा; मॅनेजर गजाआड; दोन महिलांची मुक्तता
Prostitution Case
Prostitution CasePudhari
Published on
Updated on

तासवडे टोलनाका : वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीतील हॉटेल शुक्रतारावर पोलिसांनी छापा टाकला आहे. अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली असून हॉटेल मॅनेजर सुरज मारूती सावंत (वय 27, रा. भिकवडी, ता. कडेगाव, सांगली) यास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईत परराज्यातील दोन पिडीत महिलांची मुक्तता करण्यात पोलिसांना यश आले असून गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत संपूर्ण सातारा जिल्ह्यांमध्ये अवैध वेश्या व्यवसायांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रत्येक दिल्या होत्या. या सूचनेनुसार पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी छापा टाकला. गुरुवारी तळबीड परिसरातील लॉज, हॉटेल यांची तपासणी सुरू होती. यावेळी हॉटेल शुक्रतारावर अवैध वेश्या व्यवसाय व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल शुक्रतारावर दोन ग्राहक पाठविले होते.

त्यामुळे हॉटेल शुक्रतारावर अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, निर्भया पोलीस पथकाच्या उपनिरीक्षक शीतल पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस अम़लदार प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, मयूर देशमुख, हर्षल साळुंखे, धनंजय कोळी, पुष्पा चव्हाण, सचिन गुरव, कुलदीप कोळी, गणेश बाकले, अभय मोरे आणि तेजस्विनी मोहिते यांनी छापा टाकला.

याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news