वाढेफाटा चौकातील खड्ड्यामुळे अपघाताला निमंत्रण

प्रशासनाचे दुर्लक्ष : कसरत थांबवण्याची नागरिकांची मागणी
Satara News |
सातारा : वाढे फाटा परिसरातील रस्त्यालगतचा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा-बेंगलोर महामार्गावरील वाढे फाटा चौकात रस्त्यालगत खोदलेला भला मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. भर चौकात ड्रेनेज सफाईसाठी खोदलेला हा खड्डा गेले कित्येक महिन्यांपासून तसाच असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढून या मार्गावरुन प्रवास करताना होणारी तारेवरची कसरत थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वाढे फाटा चौक हा ग्रामीण भागातून सातारा शहरात येण्याचे प्रवेश व्दार आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची रहदारी असतानाच या परिसरात व्यवसायिक व दुकानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळही वाढली आहे. सातारा-लोणंद मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडींची मोठी समस्या कायम आहे. अशातच गेल्या काही वर्षांपासून मुख्य चौकात गटार तुंबल्याने वारंवार गटारीचे पाणी रस्त्यावर येते. अनेकदा गटार दुरुस्तीसाठी येथे खोदकाम केले जाते. यावर्षीदेखील पावसाळ्यामध्ये गटार दुरुस्तीसाठी खड्डा खोदला आहे. सध्या गटाराचे पाणी आटले असले तरी हा खड्डा तसाच आहे. सध्या ऊसतोड सुरु असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या चौकातून येताना कसरत करावी लागते. अशात मुख्य रस्त्यालगतच्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. विशेषत: रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहन चालकांना दिसून येत नाही.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळणासाठी या मार्गावरुन ये -जा करणार्‍या वाहनांची मोठी संख्या आहे. रस्त्यालगतच हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. संबंधित प्रशासनाने कारवाई करुन हा खड्डा त्वरित मुजवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news