Artificial Intelligence: बिबट्यावरील उपाययोजनेसाठी एआयचा वापर

बिबट्यास प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणेत येत आहे.
Artificial Intelligence
Artificial Intelligence: बिबट्यावरील उपाययोजनेसाठी एआयचा वापरPudhari Photo
Published on
Updated on

मारूल हवेली : पाटण वनपरिक्षेत्रात वाढत असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या संदर्भात बिबट्यास प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणेत येत आहे. पाटण वनपरिक्षेत्रातील 60 गावांमध्ये बिबट्याच्या वावराची नोंद झाल्यानंतर, या समस्येवर उपाय शोधण्यासाठी वन विभागाने विविध स्तरांवर कार्यवाही सुरू केली आहे.

पाटण वनपरिक्षेत्रात वाढत असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्रामध्ये बिबट वन्यप्राण्याच्या वावराबाबत वन विभागाकडून सर्वेक्षण करणेत आले आहे. यामध्ये वनपरिक्षेत्रामधील जवळपास 60 गावामध्ये बिबट वन्यप्राण्याचा वावर असल्याचे निर्दशनास आले आहे.

बिबट्याच्या वाढत्या वावराच्या अनुषंगाने संबंधित गावामध्ये ग्रामसभा तसेच गावसभा यांचे आयोजन करून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे कार्य वन विभागाकडून सुरू केले आहे. त्याचप्रमाणे संबंधित गावामध्ये बिबट विषयक माहितीपत्रके, भित्ती पत्रके यांचे वाटप करण्यात येत आहेत. तसेच गावामधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वनपरिक्षेत्राकडील क्षेत्रीय कर्मचारी यांचेकडून रात्र गस्ती दरम्यान वाहनामधील ध्वनिक्षेपकामधून बिबट विषयी जनजागृतीपर ध्वनीफिती लावणेत येवून त्याद्वारे प्रचार व जनजागृती करण्यात येत आहे.

बिबट्यास प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणेत येत आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्रामध्ये क्षेत्रीय वापराकामी एनायडर 20, स्मार्टस्टिक 10, पिंजरे 10, ट्रॅप कॅमेरा 10 हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापैकी एनायडर हे यंत्र बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बसवणेत आले आहे. वन्यप्राणी यंत्राचे समोरून जाताच मोठा आवाज करते व सदर वन्यप्राण्याच्या वावराबावत स्थानिकांना अलर्ट करते. हे यंत्र वनपरिक्षेत्रातील निवी, आरल निसरे, सोनावडे, नाटोशी या गावामध्ये बसवणेत आले आहे.

वनपरिक्षेत्रात पुरवठा करणेत आलेल्या स्मार्ट स्टिक ह्या कर्मचारी यांचे वापराकरिता तसेच प्रायोगिक तत्वावर नाडे, निवी, बनपुरी, नाटोशी या गावामध्ये शेतकऱ्यांना वाटप करणेत आलेल्या आहेत, सदरच्या स्मार्टस्टिक मध्ये रात्रीच्या वेळी किंवा जंगल फिरती दरम्यान वन्यप्राणी समोर येताच सायरन आवाज होईल. रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये लाईट रिफ्लेक्ट करणेत येते. वन्यप्राणी जास्त जवळ किवा धारण करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी आल्यास 1 केव्ही व्होल्टेज (1 मिली ॲम्पियर) क्षमतेचा विजेचा धक्का निर्माण होतो, अशी ही प्रणाली आहे. या स्मार्ट स्टिकमुळे वन्यप्राण्याकडून अचानक होणाऱ्या हल्ल्यामध्ये बचाव होणेस मदत होणार आहे.

दरम्यान उपवनसरंक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत पाटण वनपरिक्षेत्रामधील कर्मचारी यांना क्षेत्रिय वापराकरिता स्मार्टस्टिक व एनायडरचा पुरवठा करणेत आलेला आहे. वनपरिक्षेत्रामध्ये आवश्यक ठिकाणी वन्यप्राण्यास पकडणे हेतू 10 पिंजरे पुरवठा करणेत आले आहे. त्याचप्रमाणे बिबट वन्यप्राण्याचे वावराचे प्राथमिक पडताळणी कामी 10 ट्रॅप कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती मल्हारपेठचे वनपाल सर्जेराव ठोंबरे यांनी दिली. पाटण वनपरिक्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बिबट्याच्या वावरावर नियंत्रण ठेवण्यास आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news