

सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त तरुणांना भारतीय जनता पार्टी ताकद देणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तरुणवर्गाला संधी देणार असल्याचे मत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त खा. उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथे त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर, काका धुमाळ, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जितेंद्र खानविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, शिवाजीराव शिंदे, किरण बर्गे उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त तरुणांना संधी दिली जाणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात तरुणांचा आवाज घुमला पाहिजे. त्यामुळे तरुणांना जास्त ताकद दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. सचिन पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. मनोज घोरपडे, आ. डॉ. अतुल भोसले, आ. विक्रांत पाटील, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, उपाध्यक्ष संग्राम बर्गे, गणेश संत्रे, अर्जुन काळे, भीमराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी चिन्मय कुलकर्णी यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.