Unseasonal Rain : अवकाळीने झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा !

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे आदेश
Unseasonal Rain
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटीलPudhari Photo
Published on
Updated on

साताराः राज्यात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मंत्री जाधव-पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी व विभागाने पथके गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मंत्री जाधव-पाटील यांनी दिल्या आहेत.

Unseasonal Rain
दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसन धोरण सुधारण्यासाठी अभिप्राय मागवा : ना. मकरंद पाटील

मंत्री जाधव पाटील म्हणाले, अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी सन २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी (चार हजार आठशे तेहसतीस कोटी ) रूपये तर १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९८९ कोटी ( सहा हजार नऊशे एकोणनव्वद) आणि १ एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयेची मदत देण्यात आली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

Unseasonal Rain
Pune: शहरात अवकाळी पावसामुळे विजेचा खेळखंडोबा! नागरिकांची गैरसोय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news