Udayanraje Bhosale | आयटी पार्कचे स्वप्न सत्यात आणण्यात कमी पडलो नाही, याचा अभिमान : खा. उदयनराजे

राज्य मंत्रिमंडळाने नागेवाडी, ता. सातारा येथील 42.55 हेक्टर म्हणजेच सुमारे 106 एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याला मान्यता देण्यात आली
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleFile Photo
Published on
Updated on

सातारा : राज्य मंत्रिमंडळाने नागेवाडी, ता. सातारा येथील 42.55 हेक्टर म्हणजेच सुमारे 106 एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याला मान्यता देण्यात आली. या निर्णयाबद्दल राज्यमंत्रीमंडळाचे सातारकरांच्यावतीने अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. सातारकरांचे स्वप्न सत्यात आणण्यात आम्ही कोठे कमी पडलो नाही याचा अभिमान आहे, अशा शब्दात, खा. उदयनराजे भोसले यांनी आयटी पार्कला जागा उपलब्ध करून देण्याच्या शासन निर्णयाचे स्वागत केले.

याबाबत दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, सातारा जिल्हा विकसनशीलतेकडून विकासाकडे झेपावत आहे. याचाच एक भाग म्हणून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेवून रोजगार निर्माण व्हावा, सातारच्या अर्थचक्राला गती मिळावी. यासाठी सातारा येथे आयटी पार्क उभारण्याचे प्रयत्न आज पूर्णत्वाकडे जात आहे. याकरता लिंब येथील आमची जागाही आयटी पार्कला देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, शासनाने महसूल विभागाची जागा वर्ग करुन सातारकरांना एक नवीन संधी उपलब्ध करुन दिली आहे.

सातारा किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील आयटी क्षेत्रातील बुध्दीमत्ता आणि गुणवत्ता सातत्याने पुण्या-मुंबईकडे पळत आहे. मुले परगावी किंवा परदेशात आणि पालक साताऱ्यात अशी अवस्था बहुतांशी कुटुंबात दिसत आहे. आता आयटी पार्कच नागेवाडी येथे होत असल्याने रोजगाराच्या मोठया संधी उपलब्ध राहणार आहेत. रोजगारामुळे अर्थचक्राला गती मिळणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.

यापूर्वी साताऱ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. एमआयडीसी येथे शासकीय दूध डेअरीच्या जागेमध्ये ईएसआय हॉस्पिटल सुरु होत आहे. ईएसआय हॉस्पिटलमुळे कामगार वर्गाला दिलासा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी विद्यपीठाचे उपकेंद्र सातारा येथे सुरु होणार आहे. सातारचे विमानतळ, सातारा जिल्हा कारागृह स्थलांतर करण्याचे प्रस्तावित आहे. माझ्यासह लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून विविध प्रकारची लोकोपयोगी विकासकामे झाली आहेत आणि सुरु आहेत. त्यामुळेच सातारा जिल्हा विकासाकडे मोठया वेगाने झेपावत आहे, असेही खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news