

नागठाणे : भरतगाववाडी ता.सातारा येथील म्हसोबा या ठिकाणी विजेचा करंट देऊन डुकराची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकून मृत डुक्कर व शिकारीसाठी लागणार्या साहित्यासह दोघांना ताब्यात घेतले.
पंकज गणपत घोरपडे (वय 40) व महेश मारुती पडवळ (दोघेही रा.भरतगाववाडी ता.सातारा) यांना ताब्यात घेतले. या दोघांवर वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौदळ,वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपाळे, वनपाल सुनील शिंदे, वनरक्षक अभिजित कुंभार, मुकेश राउळकर, सुहास काकडे,संतोष दळवी यांनी केली.