Makrand Patil | जिल्हा परिषदेचे घोडामैदान जवळच आहे तेव्हा कळेलच: ना. मकरंद पाटील

20 तारीख दूर नाही, घोडे मैदान जवळ आले आहे, असे सूचक वक्तव्य मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले
Makarand Patil
Makarand PatilPudhari Photo
Published on
Updated on

खंडाळा : सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांपैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आल्याचा आनंद आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा जनतेने दिला आहे. सातारा जिल्हा परिषदेवर कोणाचा दावा आहे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावर मला काही बोलायचे नाही. 20 तारीख दूर नाही, घोडे मैदान जवळ आले आहे, असे सूचक वक्तव्य मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. दरम्यान, फलटणमधील सभापतीदेखील घड्याळ चिन्हावर निवडून आले असल्याचे सांगत त्यांनी माण, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, खंडाळा व फलटण अशा सहा ठिकाणी घड्याळ चिन्हावरील सभापती निवडून आल्याचेही ते म्हणाले.

खंडाळा पंचायत समितीला मोठा इतिहास आहे. अनेक दिग्गज मान्यवरांनी या पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले आहे. या तालुक्याला विकासाची दिशा देण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून झाले आहे. यावेळी पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे.

नवनिर्वाचित सभापती छाया जाधव, उपसभापती संतोष वीर तसेच सर्व सदस्य तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करतील. तसेच गावागावातील अडचणी सोडवणे तसेच शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून पंचायत समितीतील निवड सार्थ ठरवतील. या निवडणुकीत भाजप सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे सांगतानाच महाराष्ट्रात जरी युती असली तरी वाई येथे मात्र निवडणूक झाली, असे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news