शहीद कर्नल संतोष महाडिक यांना अभिवादन

Martyr Colonel Santosh Mahadik | लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रतापसिंग यांच्याकडून स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण
Tributes to martyr Colonel Santosh Mahadik |
सातारा : शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृतिस्तंभाला अभिवादन करताना वीरमाता कालिंदी, मुलगी कार्तिकी महाडिक. Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथील अमर जवान स्मृतिस्तंभावर वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल पुष्पचक्र वाहून लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रतापसिंग, युद्ध सेवा पदक, चीफ ऑफ स्टाफ, सदर्न कमांड, पुणे यांनी सन्मानपूर्वक अभिवादन केले.

यावेळी सैनिक स्कुल साताराचे प्राचार्य कॅप्टन के. श्रीनिवासन, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सतेश हांगे, निवृत्त कर्नल गिरीधर कोळे, कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरमाता कालिंदी महाडिक, कन्या कार्तिकी, निवृत्त नौसैनिक वर्गमित्र, सोबत काम केलेले शंकर माळवदे तसेच अधिकारी, निवृत्त सैनिक यांनीही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.

यावेळी शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या आई कालिंदी महाडिक यांनी माझ्या मुलाचे देशासाठी दिलेले शौर्य व बलिदान न विसरणारे असून युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने व नगरपालिकेने स्मृती उद्यानाचे काम चांगले केले असे सांगून उपस्थितांनी शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा दिला.

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या आई व मुलीशी लेफ्टनंट जनरल यांनी साधला संवाद

लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांनी शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या आईची व मुलीची आस्थेने संवाद साधला. तसेच स्मृती उद्यानातील उभारण्यात आलेल्या शिल्पांची व वीर सैनिकांच्या नामोउल्लेख असलेल्या पाट्यांची पाहणी केली. 41 व्या राष्ट्रीय रायफलचे सेना मेडल कर्नल संतोष महाडिक यांना दि. 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू आणि काश्मिर मधील कुपवाडा येथे दशहतवाद्यांशी लढा देताना वीरमरण आले. कर्नल संतोष महाडीक यांना शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news