Tiger Baji: उदगिरी बफर क्षेत्रात ‌‘बाजी‌’ वाघाचे दर्शन

आंबा वनपरिक्षेत्रातील उदगिरी, तालुका शाहूवाडी या बफर क्षेत्रात उदगिरी काळम्मादेवी यात्रेदरम्यान कोयना अभयारण्य परिसरातील ‌‘बाजी‌’ या वाघाचे दर्शन या ठिकाणी झाले
Tiger Baji
Tiger Baji: उदगिरी बफर क्षेत्रात ‌‘बाजी‌’ वाघाचे दर्शन Pudhari
Published on
Updated on

कराड : चांदोली राष्ट्रीय उद्यान अंतर्गत आंबा वनपरिक्षेत्रातील उदगिरी, तालुका शाहूवाडी या बफर क्षेत्रात उदगिरी काळम्मादेवी यात्रेदरम्यान कोयना अभयारण्य परिसरातील ‌‘बाजी‌’ या वाघाचे दर्शन या ठिकाणी झाले आहे. ‌‘बाजी‌’ या वाघाचे ट्रॅप कॅमेरामध्ये स्पष्ट चित्रण झाले.

दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी काळम्मादेवीची भव्य यात्रा भरते. हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यात्रेच्या काळात गावात भक्तीमय वातावरण निर्माण होते. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने वनक्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन्यजीव विभाग विशेष दक्षता घेतो. वन वनवा होऊ नये, अवैध वृक्षतोड अथवा अवैध शिकार यांसारखे प्रकार घडू नयेत यासाठी विविध ठिकाणी अधिकारी व कर्मचारी तैनात केले जातात. गस्त पथके, ट्रॅप कॅमेरे आणि सतत निरीक्षण यांद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जाते.

उदगिरीतील काळम्मादेवी मंदिराचे पुजारी सांगतात“आमच्या उदगिरी गावाला वाघ काही नवीन नाही. विशेष म्हणजे, देवीच्या यात्रेच्या काळातही वाघ मंदिर परिसरात येतो,अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे. वन्यजीव विभागाच्या नोंदींमुळे त्याला वस्तुनिष्ठ आधारही मिळाला आहे. सन 2024 आणि 2025 मध्ये झालेल्या यात्रेदरम्यान मंदिर परिसरात ‌‘सेनापती‌’ या नर वाघाचे ताजे ठसे आढळून आले होते. वनकर्मचाऱ्यांनी त्या ठशांची नोंद घेऊन त्याची खातरजमा केली. याशिवाय, नुकत्याच पार पडलेल्या यात्रेच्या वेळी कोयना अभयारण्य परिसरातील ‌‘बाजी‌’ या वाघाचे ट्रॅप कॅमेरामध्ये स्पष्ट चित्रण झाले. हा वाघ उदगिरी परिसरात येऊन गेल्याचे पुरावे मिळाले आहेत.

वन्यजीव विभागाच्या सतर्कतेमुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे येथे मानव आणि वन्यजीव यांच्यातील समतोल अबाधित राखला जात आहे. श्रद्धा आणि विज्ञान, परंपरा आणि संरक्षण या सर्वांचा सुंदर मेळ उदगिरीच्या भूमीत दरवर्षी अनुभवायला मिळतो.
- तुषार चव्हाण क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news