Satara Theft News: चोरटा जेरबंद; 18 तोळे सोने हस्तगत

विकासनगरमधील चोरीचा छडा; संशयित सापडला एमआयडीसीत
Satara Theft News |
पोलिसांच्या पथकाने मुद्देमालासह संशयितास (खाली बसलेला) अटक केली.Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असताना विकासनगर येथील घरफोडी झाल्यानंतर पोलिसांना एका संशयितावर संशय आला. त्याला पोलिसांनी येथील एमआयडीसीमधून अटक केली असून त्याने 18 तोळे सोने चोरल्याचे उघड झाले. जीवन शहाजी रावते (वय 27, रा. कोडोली, ता. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सातारा शहर डी. बी. पथकातील स्टाफ हे घरफोडीतील सराईत आरोपीची माहिती घेत असताना सराईत आरोपी जीवन रावते याच्यावर संशय आला. जीवन हा गुन्हा केल्यापासून सातारा शहरातून परागंदा झाला होता. तो सातारा शहरातील एमआयडीसी परिसरामध्ये आला असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. डी. बी. पथकाने एमआयडीसी परिसरामध्ये सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आरोपीला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केला असता आरोपी जीवनने सातारा शहर हद्दीत जून महिन्यामध्ये डिफेन्स कॉलनी, विकासनगर, सातारा येथील एका घरातील कपाटातून दागिने चोरी केली असल्याची कबुली दिली.

तसेच या गुन्ह्यातील चोरीला गेलेले 18 तोळे सोन्याचे दागिने एकूण रक्कम 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल त्याने काढून दिला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपअधीक्षक राजीव नवले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि श्याम काळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलिस हवालदार सुजीत भोसले, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, पोलिस नाईक पंकज मोहिते, पोलिस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सुहास कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news