आयटीआय प्रशिक्षणाकडे कल वाढला

जिल्ह्यात 3900 जागांसाठी 4803 अर्ज : दि. 7 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी
The trend towards ITI training increased
आयटीआय प्रशिक्षणाकडे कल वाढलाPudhari Photo
Published on
Updated on

सातारा,पुढारी वृत्तसेवा : आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील 18 औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधील 3900 जागांसाठी 4803 प्रवेश अर्ज आले आहेत. आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असून, प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, आलेल्या प्रवेश अर्जांची छाननी होऊन आज प्राथमिक गुणवत्ता यादी व रविवार दि. 7 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती आयटीआय प्रवेश जिल्हा समन्वयक प्रशांत हतागळे यांनी दिली. सुशिक्षत बोरोजगारांची संख्या वाढत असल्याने अलीकडे पारंपरिक शिक्षणापेक्षा रोजगाराभिमुख शिक्षणावर भर दिला जात आहे.

त्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाबरोबरच कमी कालावधीचे प्रशिक्षण व हमखास रोजगार यामुळे आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. आयटीआयच्या विविध ट्रेडच्या प्रशिक्षणासाठी नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत नुकतीच संपली जिल्ह्यात 11 शासकीय व 7 खासगी अशी एकूण 18 औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. या आयटीआयमधील 3900 प्रवेश क्षमतेसाठी 5803 प्रवेश अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी गुरुवार दि.4 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावरील हरकती झाल्यानंतर रविवार दि. 7 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. पहिली प्रवेश फेरी रविवार दि. 14 जुलै रोजी जाहीर होणार आहे. दि. 15 जुलैपासून प्रत्यक्ष प्रवेश दिले जाणार आहेत.

The trend towards ITI training increased
मुंबई : सरकारच्या अनागोंदीमुळे ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना : अंबादास दानवे

आयटीआय प्रवेशातही चुरस...

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पदविका अभ्यासक्रम 3 वर्षे व पदवी अभ्यासक्रम 4 वर्षांचे असतात. याउलट आयटीआयचे विविध ट्रेडचे प्रशिक्षण 1 ते दोन वर्षांपर्यंतचे असते. ते प्रशिक्षण पूर्ण केल्यावर औद्योगिक कारखान्यांमध्ये हमखास नोकरी मिळत आहे. त्यामुळे कमी कालावधीत रोजगार उपलब्ध होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षात आयटीआय प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश मागणी जास्त असल्याने आयटीआय प्रवेशातही यावर्षी चुरस राहणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news