वारकर्‍यांसाठी धोकादायक ठरलेली इमारत हटवली

फलटण शहरातील 77 इमारती डेंजर झोनमध्ये : कारवाईची मोहीम तीव्र
The Phaltan Municipality has started action to demolish the dangerous building.
फलटण नगरपालिकेच्या वतीने धोकादायक इमारत हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.Pudhari File Photo
Published on
Updated on

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराजवळील वारकर्‍यांसाठी धोकादायक असलेली इमारत नगरपालिकेने हटवली. धोकादायक इमारतींबरोबर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम नगरपालिका हाती घेणार असल्याचे संकेत मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिले.

फलटण शहरामध्ये 77 धोकादायक इमारती आहेत. मिळकतधारकांना इमारती उतरवण्यासाठी नगरपालिकेने नोटिसा दिल्या आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परतीच्या वेळी विठ्ठल मंदिरामध्ये थांबते त्या शेजारीच असलेली धोकादायक इमारत काढण्याबाबत वारंवार सूचना देऊनही काढली जात नव्हती. या धोकादायक इमारतीमुळे वारकर्‍यांना धोका संभवत होता. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी पुढाकार घेऊन नगरपालिकेच्या खर्चाने ही धोकादायक इमारत काढून टाकली. सदरची इमारत ट्रस्टच्या मालकीची असल्याने इमारत काढण्यासाठी आलेला खर्च मिळकत धारकाकडून घेण्यात येणार आहे. इमारत हटवताना नगरपालिकेचे नगररचना, बांधकाम आरोग्य विभाग, वीज वितरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी फलटण शहर पोलिस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

The Phaltan Municipality has started action to demolish the dangerous building.
मुंबईत अतिक्रमण पथक आणि पोलिसांवर दगडफेक

मुख्य चौकातील अतिक्रमणे हटवणार : मुख्याधिकारी

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चौकात व मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे सोमवारी काढण्यात येणार आहेत. फलटण शहरात 77 धोकादायक इमारती आहेत. या इमारती संबंधित मिळकतधारकांनी स्वतःहून काढाव्यात. यासाठी संबंधित मिळकत धारकांना नगरपालिकेने नोटीसा दिल्या आहेत. मिळकत धारकांनी धोकादायक इमारती काढल्या नाहीत तर नगरपालिका पालखी सोहळा संपल्यानंतर धोकादायक इमारती हटवण्याची मोहीम हाती घेणार आहे. धोकादायक इमारती हटवण्याचा खर्च नगरपालिका मिळकत धारकाकडून वसूल करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परतीच्या वेळी विठ्ठल मंदिरात मुक्कामी असते. मंदिरा शेजारी असलेली इमारत ट्रस्टच्या मालकीची आहे. इमारत स्वतःहून काढण्यासाठी ट्रस्ट पुढाकार घेत होती. विठ्ठल मंदिरा शेजारी असलेली ही धोकादायक इमारत हटवल्याने वारकर्‍यांना या इमारतीपासून धोका संभवत होता तो आता टळला आहे.
-राजेश हेंद्रे, अध्यक्ष, संत नामदेव विठ्ठल मंदिर ट्रस्ट, फलटण
The Phaltan Municipality has started action to demolish the dangerous building.
नाशिक महापालिकेसमोर विक्रेत्यांचे ‘भाजीफेक’ आंदोलन, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या विरोधात संताप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news