Phaltan Doctor Death|आत्महत्या नसून हत्याच : सुषमा अंधारे

चौकशीसाठी उच्च न्यायालयाने समिती गठित करण्याची मागणी
 Sushma Andhare
सुषमा अंधारे Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे : फलटणमध्ये झालेल्या महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ती संस्थात्मक हत्या आहे. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या दबावामुळेच हा प्रकार घडला आहे. निंबाळकर यांच्यासह संबंधित पोलिस अधिकार्‍यांची चौकशी करावी. त्यासाठी उच्च न्यायालयाने समिती गठित करावी, अशी मागणीही शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संपर्कप्रमुख अनंत घरत यांच्यासह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे आगवणे कुटुंबीय उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निंबाळकर यांना क्लीन चिट कसे देतात? निंबाळकर यांच्यासह महिला डॉक्टरला त्रास देणार्‍या आणि दबाव टाकणार्‍या पोलिस अधिकारी, स्वीय सहायकांची चौकशी झाली पाहिजे. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार निंबाळकर त्यांच्या साखर कारखान्यासाठी आणत होते. कामगार कारखाना सोडून जाऊ नये, यासाठी त्यांना मारहाणही करण्यात आली असल्याचे अंधारे यांनी यावेळी सांगितले.

फलटण पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांच्या मदतीने कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केले जात होते. सरकारी दवाखान्यात त्यांना दाखल करून कामगार शारीरिक तंदुरुस्ती (फिजिकली फिट) दाखविले जात होते. हे करण्यासाठी या महिला डॉक्टरवर दबाव टाकला जात होता. यासंदर्भात संबंधित महिला डॉक्टरने वरिष्ठांना पत्र दिले होते. आत्महत्येवेळी तिने हातावर लिहिलेल्या मजकुरातील हस्ताक्षर तिचे नसल्याचा दावा डॉक्टरच्या कुटुंबाने केला आहे. फलटणमध्ये घर असतानाही ही महिला घटनेपूर्वी निंबाळकर यांच्या निकटवर्तीयाच्या हॉटेलवर गेली होती. ती का गेली, याची चौकशी झाली पाहिजे. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. त्यामुळे इतर कोणत्या तपास यंत्रणांमार्फत चौकशी न करता न्यायालयाने समिती स्थापन करावी, अशी मागणीही अंधारे यांनी या वेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news