Shambhuraj Desai | साखर उद्योगाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे : पालकमंत्री शंभूराज देसाई

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कारखान्याची आर्थिक शिस्त, उत्पादन खर्चावर नियंत्रण आणि ऊस उत्पादकांना वेळेत योग्य दर देण्यावर भर
Shambhuraj Desai | साखर उद्योगाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे : पालकमंत्री शंभूराज देसाई
Published on
Updated on

सणबूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कारखान्याची आर्थिक शिस्त, उत्पादन खर्चावर नियंत्रण आणि ऊस उत्पादकांना वेळेत योग्य दर देण्यावर भर देण्यात येणार आहे. आगामी गळीत हंगामात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, सहकारी साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन ठामपणे पाठीशी राहील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दौलतनगर येथे खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, चि. आदित्यराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अशोकराव पाटील, उपसभापती विजय पवार, बाळासाहेब पाटील, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. डी. पी. जाधव, ॲड. बाबुराव नांगरे, शशिकांत निकम, प्रशांत पाटील, सुनील पानस्कर, बशीर खोंदू, अभिजित पाटील, चंद्रकांत पाटील, सुरज चव्हाण, विजय जंबुरे व कार्यकारी संचालक प्रदीप यादव यांच्यासह पदाधिकारी, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.

ना. देसाई म्हणाले, कारखान्याने सभासदांच्या हिताला प्राधान्य देत आर्थिक शिस्त कायम राखावी. उत्पादन खर्च कमी करून कार्यक्षमता वाढविणे गरजेचे आहे. ऊस उत्पादकांना वेळेत व योग्य दर मिळण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. साखर उद्योगाच्या हितासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news