Satara Pusegaon shuttle bus: सातारा-पुसेगाव मार्गावर एसटीची शटल बस सेवा सुरू

सातारा-पुसेगाव या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गावर अखेर शटल बससेवा सुरू झाली आहे
ST Bus
ST Bus Pudhari
Published on
Updated on

कोरेगाव : सातारा-पुसेगाव या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गावर अखेर शटल बससेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या कोरेगाव आगाराने प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद दिला आहे. शुक्रवारपासून या सेवेची अंमलबजावणी सुरू झाली असून, विद्यार्थ्यांसह भाविक व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुसेगाव येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, तसेच स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजांचा विचार करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

या निर्णयामागे सातारा जिल्हा एसटी प्रवासी संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. संघटनेने वारंवार निवेदने देत लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी संवाद साधून या मार्गावरील बससेवेची गरज अधोरेखित केली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. यापूर्वी या मार्गावर सुपरफास्ट बस सेवा होती; मात्र त्या बसेस छोट्या गावांमध्ये थांबत नसल्याने 15 ते 20 गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

नवीन शटल सेवेनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत दर तासाला बस धावणार आहे. या बससेवेचा लाभ पुसेगाव, वर्धनगड, नेर, विसापूर, रामोशीवाडी, भाटमवाडी, चिमणगाव, वडाचीवाडी, कुमठे फाटा, कोरेगाव, शिरढोण, ल्हासुर्णे, मुगाव, जरेवाडी, तांदुळवाडी, मंगळापूर, भिवडी, जांब बुद्रुक, त्रिपुटी, खावली, क्षेत्र माहुली, संगम माहुली आदी गावांतील प्रवाशांना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news