ST Mobile App: एसटीचे मोबाईल अ‍ॅप प्रवाशांसाठी ठरतेय पर्वणी

तिकिटासाठी दरमहा 5 लाख प्रवाशांकडून होतोय अ‍ॅपचा वापर
ST Mobile App |
ST Mobile App: एसटीचे मोबाईल अ‍ॅप प्रवाशांसाठी ठरतेय पर्वणीPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत आहे. सध्या या अ‍ॅपचे सुमारे 10 लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत. वापरकर्त्यांपैकी सरासरी दरमहा 5 लाख प्रवासी मोबाईल अ‍ॅपवरून तिकीट काढत आहेत. त्यामुळे एसटीचे मोबाईल अ‍ॅप प्रवाशांसाठी पर्वणी ठरू लागले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने काही महिन्यापूर्वी मोबाईल अ‍ॅपमध्ये सुधारणा करुन नवीन व्हर्जन सुरु केले आहे. त्याचा मुख्य हेतू प्रवाशांना बसची आरक्षण सेवा अधिक सुलभ पध्दतीने उपलब्ध करणे असा आहे. पारंपरिक तिकीट खरेदी व थेट बसस्थानकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनवरुन तिकिट खरेदी करु शकतात. प्रवासाची माहिती तपासू शकतात.

1 एप्रिल 2025 पासून सुरु केलेल्या नवीन एमएसआरटीसी बस रिझर्वेशन अ‍ॅपला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मार्च 2025 मध्ये 3 लाख 94 हजार प्रवाशी जुन्या मोबाईल अ‍ॅपचा वापर करत होते. सुधारीत अ‍ॅप आल्यानंतर मे 2025 मध्ये सुमारे 6 लाख 72 हजार प्रवाशांनी नवीन मोबाईल अ‍ॅपचा वापर केला आहे.

सध्या 10 लाख वापरकर्त्यांपैकी सरासरी दरमहा 5 लाख प्रवासी सुधारीत मोबाईल अ‍ॅपवरून तिकीट काढत आहेत.

तसेच ज्येष्ठ नागरिक किंवा तांत्रिकद़ृष्ट्या पारखी नसलेल्या प्रवाशांसाठी अ‍ॅपचा वापर अवघड असल्याचेही काही प्रतिक्रिया आहेत. ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने स्थानिक सुविधांचा विचार करून अ‍ॅपचे युआय, युएक्स अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. एसटीच्या या अ‍ॅपमुळे प्रवाशी घरबसल्या एसटीचे तिकीट काढू शकत आहेत. तसेच बसचे लाईव्ह लोकेशन पाहण्यास मिळणार आहे. त्याचबरोबर प्रवासाची माहितीही मिळू शकणार आहे.

एसटीच्या मोबाईल अ‍ॅपला प्ले स्टोअर अ‍ॅपमध्ये 4.6 स्टारचे रेटिंग मिळाले आहे. अर्थात, या अ‍ॅपला मिळणारा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद हा आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या एक महत्त्वाच्या टप्प्यांचे संकेत देतो. तंत्रज्ञानाचा वापर योग्य नियोजन व स्थानिक अडचणींचा विचार करुन केला तर प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित पर्यावरणपूरक सेवा मिळण्याची शक्यता वाढते.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, एस.टी. महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news