

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाचे 2 लाख 88 हजार 494 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी 2 लाख 50 हजार 751 क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून जिल्ह्यात 87 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीचे सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असून 86 हजार 913 हेक्टरवर त्याची पेरणी झाली आहे तर त्या खालोखाल 38 हजार 970 हेक्टर क्षेत्र बाजरीचे आहे. दरम्यान, पावसामुळे पिकांची उगवण क्षमता चांगली असून पश्चिम भागात भात लागणीची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत.
जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुळवाफेवर मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी पेरण्या केल्या तर काही शेतकर्यांनी पावसानंतर प्रत्यक्ष पेरणीस प्रारंभ केला. पेरणी झालेल्या पिकांची उगवणक्षमता चांगली असून सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात भात लागणीची कामे युध्दपातळीवर सुरु असली तरी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात भात 24 हजार 492 हेक्टर, खरीप ज्वारी 6 हजार 810 हेक्टर, बाजरी 38 हजार 970 हेक्टर, नागली 2 हजार 225 हेक्टर, मका 14 हजार 369 हेक्टर, इतर तृण धान्य 234 हेक्टर, तूर 416 हेक्टर, मूग 9 हजार 129 हेक्टर, उडीद 2 हजार 400 हेक्टर, इतर कडधान्य 37 हजार 90 हेक्टर, भुईमूग 26 हजार 819 हेक्टर, तीळ 38 हेक्टर, कारळा 167 हेक्टर, सुर्यफूल 184 हेक्टर, सोयाबीन 86 हजार 913 हेक्टर, कापूस 486 हेक्टर असे मिळून 2 लाख 50 हजार 751 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी 87 टक्के आहे.
सातारा तालुक्यात 27 हजार 266 हेक्टर, जावली तालुक्यात 11 हजार 24 हेक्टर, पाटण तालुक्यात 40 हजार 362 हेक्टर, कराड तालुक्यात 35 हजार 433 हेक्टर, कोरेगाव तालुक्यात 18 हजार 709 हेक्टर, खटाव तालुक्यात 37 हजार 623 हेक्टर, माण तालुक्यात 38 हजार 46 हेक्टर, फलटण तालुक्यात 12 हजार 133 हेक्टर, खंडाळा तालुक्यात 13 हजार 450 हेक्टर, वाई तालुक्यात 14 हजार 464 हेक्टर, महाबळेश्वर तालुक्यात 2 हजार 242 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या आडसाली उसाच्या लावणी सुरू आहेत. उसाचे 98 हजार 479 सर्वसाधारण क्षेत्र असून सातारा तालुक्यात 2 हजार 237 हेक्टर, जावली 56 हेक्टर, पाटण 22 हेक्टर, कराड 7 हजार 635 हेक्टर, कोरेगाव 1 हजार 836 हेक्टर, खटाव 400 हेक्टर, माण 3 हेक्टर, फलटण 774 हेक्टर, खंडाळा 384 हेक्टर, वाई 37 असे मिळून 13 हजार 384 हेक्टर क्षेत्रावर उसाची नवीन लावण झाली आहे.