Pune Accident: आईच्या वाढदिवसाला आलेल्या मुलाचा पुण्यात अपघाती मृत्यू

बोरणे, ता. सातारा येथील 32 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली
Pune Accident: आईच्या वाढदिवसाला आलेल्या मुलाचा पुण्यात अपघाती मृत्यू
Published on
Updated on

सातारा : बोरणे, ता. सातारा येथील 32 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. गुरुवारी त्याच्या आईचा वाढदिवस असल्याने तो मुंबईवरून पुण्यात आला होता. नवले पूल क्रॉस करत असताना दुचाकीने त्याला धडक दिली. यामध्‍ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सुमित नारायण कदम (सध्या रा. नेरूळ, नवी मुंबई, मूळ रा. बोरणे, ता. सातारा) असे ठार झालेल्‍या युवकाचे नाव आहे. सुमितचा मोठा भाऊ हा इंजिनिअर असून त्याच्या फॅमिलीसह पुण्यात राहिला होता. सुमितचे वडील बाहेर गेल्याने त्याची आई मोठ्या मुलाकडे आली होती. गुरुवारी आईचा वाढदिवस असल्याने सुमितने मोठ्या भावास मी पुण्याला येतो, आईचा वाढदिवस जोरात साजरा करू, असे सांगितले होते. बुधवारी काम संपवून तो रात्री बारा वाजता मुंबईवरून पुण्याला यायला निघाला.

पहाटे चारच्या सुमारास तो नवले पुलाजवळ उतरला. रस्ता क्रॉस करत असताना अचानक सुसाट आलेल्‍या दुचाकी चालकाने त्याला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news