

कराड : ओगलेवाडी (ता. कराड) येथे मोबाईल हॉटस्पॉट सुरू न केल्याच्या रागातून युवकाने वडिलांवरच खुरप्याने हल्ला केला. दगडानेही मारहाण केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत राजू कासम मुल्ला यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सूरज मुल्ला या संशयिताचे नाव आहे.
ओगलेवाडी येथील राजू मुल्ला हे मंगळवारी दुपारी घरात काम करीत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा सूरज हा तेथे आला. त्याने वडिलांना त्यांच्या मोबाईलचा हॉटस्पॉट सुरू करण्यास सांगितले होते. मात्र, कामात असल्यामुळे राजू मुल्ला यांनी थोड्या वेळाने हॉटस्पॉट सुरू करतो, असे त्याला सांगितले. त्यावर चिडून सूरजने वडिलांवर खुरप्याने वार केला. दगड मारून जखमी केले आहे.