Jaykumar Gore : माऊलींसाठी ना. गोरेंची बुलेट वारी

वाहतूक कोंडीत अडकल्याने बुलेटवरून जाऊन केले सोहळ्याचे स्वागत
Jaykumar Gore
माऊलींसाठी ना. गोरेंची बुलेट वारी
Published on
Updated on

शिखर शिंगणापूर : पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढी निघालेला संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे वाहतूक त्यांची वाहने पालखी मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकल्याने ना. गोरे यांनी चक्क बुलेटवरून प्रवास करत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांचा मेळा ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा गजर करत पंढरीकडे मार्गस्थ होत आहे. रविवार सकाळी सव्वादहाच्या सुमारास माऊलींचा पालखी सोहळा सातारा–सोलापूर जिल्हा सीमेवरील धर्मपुरी गावच्या हद्दीत दाखल झाला. यावेळी सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखी सोहळ्यास भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला तर सोलापूर जिल्हा प्रशासनाने माऊलींच्या पालखी सोहळ्याचे उत्साही वातावरणात स्वागत केले.

याचवेळी शिंगणापूरमार्गे धर्मपुरीकडे पालखीच्या स्वागत सोहळ्यासाठी येणारे सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांची वाहने पालखी मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत अडकल्याने ना. गोरे यांना धर्मपुरी येथील स्वागत सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. त्यामुळे पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.

दरम्यान शिंगणापूर पाटीनजीक वाहतूक कोंडीत अडकलेले ना. जयकुमार गोरे तसेच यांनी चार चाकी वाहने त्याच ठिकाणी सोडून एका बुलेटचा ताबा घेतला. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ना. जयकुमार गोरे व माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे दोघेही एकाच बुलेटवर स्वार होऊन पालखी सोहळ्याकडे रवाना झाले. त्यानंतर धर्मपुरी येथील पुलावर बुलेट थांबवून ना. गोरे यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्‍वस्त श्री योगी निरंजननाथ यांची भेट घेतली. त्यानंतर बरडच्या दिशेने येणाऱ्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये ना. गोरे सहभागी झाले. यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.

वारकऱ्यांच्या वेशभूषेत असलेल्या ना. गोरे यांनी पालखी रथाचे सारथ्य केले त्यानंतर ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत ना. जयकुमार गोरे यांच्यासह माजी आ. राम सातपुते यांनी वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये सहभागी होऊन चालण्याचा आनंद घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news