Shrikant Shinde: मित्राच्या लग्नाला पोहोचता आले नाही, म्हणून श्रीकांत शिंदे थेट पूजेसाठी साताऱ्यात मित्राच्या घरी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना साताऱ्यातील आपल्या कॉलेज मित्राच्या लग्नाला परदेशात असल्यामुळे पोहोचता आलं नाही, म्हणून मित्राच्या लग्नाच्या पूजेला पोहोचले.
Shrikant Shinde
Shrikant Shindepudhari photo
Published on
Updated on

Dr. Shrikant Shinde Satara visit friend wedding

सातारा: राजकारणाच्या व्यापात अनेकजण जुने मित्र आणि नाती विसरतात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कॉलेज मित्राशी असलेली मैत्री आजही तितक्याच आपुलकीने जपल्याचे पाहायला मिळाले. परदेश दौऱ्यामुळे मित्राच्या लग्नाला उपस्थित राहता आले नाही, म्हणून त्यांनी साताऱ्यात पूजे दिवशी थेट मित्राच्या घरी जाऊन नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या कृतीमुळे सध्या साताऱ्यात या मैत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Shrikant Shinde
Satara Politics : गडकरी-फडणवीस वेगवेगळ्या ‌‘मांडवात‌’

साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अजित शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कॉलेज जीवनापासूनचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. डॉ. अजित शिंदे यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. मात्र, त्यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे हे कामानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्याने या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.

परदेशातून भारतात परतल्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अजित शिंदे यांच्या साताऱ्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर, त्यांनी मित्राच्या घरी त्याच्या कुटुंबियांसोबत भोजनाचाही आस्वाद घेतला.

राजकारणात कितीही मोठे पद मिळाले, तरी पाय जमिनीवर असावेत आणि जुने मित्र विसरता कामा नयेत, हेच खासदार शिंदेंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, अशा भावना सातारकरांकडून व्यक्त होत आहेत.

Shrikant Shinde
Sunetra Pawar | कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news